Ad will apear here
Next
‘सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन’चे पुरस्कार जाहीर
ज्ञानेश्वर मुळ्ये, विश्वमोहन भट्ट, सुरेश तळवलकर, शक्ती कपूर आदींचा होणार गौरव
डॉ. संजय चोरडिया
पुणे : सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे दिले जाणारे ‘सूर्यदत्ता जीवनगौरव’ आणि सूर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. 

हुकमीचंद चोरडिया (ग्लोबल आंत्रेप्रिन्युअरशीप), ग्रॅमी पुरस्कारप्राप्त पद्मभूषण विश्वमोहन भट्ट (भारतीय शास्त्रीय कला), ज्ञानेश्वर मुळ्ये (प्रशासकीय सेवा), पद्मश्री तालयोगी पंडित सुरेश तळवलकर (भारतीय शास्त्रीय संगीत), डॉ. अरविंद नातू (विज्ञान-तंत्रज्ञान), रमणलाल शहा (ज्योतिषशास्त्र), शक्ती कपूर (चित्रपट व कला), असितकुमार मोदी (निर्मिती-दिग्दर्शन), फारुक मास्टर (वैद्यकीय सामाजिक सेवा), शाम अगरवाल (पत्रकारिता) यांना ‘सूर्यदत्ता जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे, तर पद्मश्री मिलिंद कांबळे (औद्योगिक सामाजिक सेवा), रितु प्रकाश छाब्रिया (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी), विष्णू मनोहर (हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट), डॉ. अर्चिका सुधांशू (अध्यात्म), संदीप गादिया (सायबर सुरक्षा), लायन विजय भंडारी (सामाजिक उद्योगता व मानवता), मनिष पॉल (मनोरंजन), सुरी शांदिया (बँकिंग अॅन्ड फायनान्स), डॉ. शैलेश गुजर (माध्यम व जनसंपर्क), बीके सुजाथाबेन राठी (वैद्यकीय संशोधन), निवेदिता साबू (फॅशन डिझाइन), मानसी गुलाटी (आरोग्य), विपुल कासार (स्टार्टअप व इनोव्हेशन), अंकिता श्रॉफ (महिला उद्योजक) यांना ‘सूर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र व उपरणे असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सूर्यदत्ता पुरस्काराचे मानकरी
‘सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त हे पुरस्कार देण्यात येत असून, यंदा पुरस्कारांचे सतरावे वर्ष आहे. या पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी, सात फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी पाच वाजता बावधन येथील सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये होणार आहे. या पुरस्कारांचे वितरण विद्या वाचस्पती पंडित डॉ. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट जनरल (डॉ.) डी. बी. शेकटकर (निवृत्त), प्रसिद्ध कवी शैलेश लोढा, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक उपस्थित राहणार आहेत,’ अशी माहिती सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, जनसंपर्क व मनुष्यबळ विभागाच्या संचालिका कॅप्टन शालिनी नायर व नूतन जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. संजय चोरडिया म्हणाले, ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये चालविण्यात येत असलेल्या अभ्यासक्रमांना पूरक विविध क्षेत्रातील आदर्श व यशस्वी व्यक्तिमत्त्वांना हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. समाजातील वंचित घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी नि:स्वार्थी भावनेने कार्यरत सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचाही सन्मान करण्यात येतो. या वर्षी आरोग्य, तंदुरुस्ती आणि जीवनशैली यावर भर देण्यात आला असून, चार पुरस्कारार्थी या क्षेत्रातील आहेत. शारीरिक आणि मनाच्या तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी या व्यक्तींचे मार्गदर्शन प्रेरक ठरेल, असा मला विश्वास वाटतो. या पुरस्कारार्थींनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासह त्या त्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या कामातून प्रेरणा मिळावी, हा या पुरस्कार सोहळ्यामागील उद्देश आहे. या मान्यवर व्यक्ती सूर्यदत्ता ग्रुपशी जोडल्या गेल्या असून, विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे.’  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZXPBX
Similar Posts
‘सूर्यदत्ता’करणार व्यसनमुक्ती, नीतिमूल्यांची रुजवण पुणे : ‘समाजातील व्यसनाधीनता दूर करून, नीती आणि मूल्यांचे शिक्षण देत समाजाचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे ‘सूर्यदत्ता ग्लोबल रिहॅबिलिटेशन सेंटर’ सुरू करण्यात आले आहे. या पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन मुक्तांगण पुनर्वसन केंद्राच्या मुक्ता पुणतांबेकर यांच्या हस्ते होणार आहे
‘मानवाच्या अंतर्बाह्य परिवर्तनासाठी ध्यानसाधना उपयुक्त’ पुणे : ‘माणसाच्या आंतरिक परिवर्तनासाठी ध्यानसाधना अतिशय गरजेची असते. त्यामुळे आपली एकाग्रता व निर्णयक्षमता वाढते. प्रत्येक व्यक्तीने ध्यान केले पाहिजे. ध्यान आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला पाहिजे. आपल्या दिवसाची सुरुवात आणि समाप्ती ध्यानाने व्हायला हवी,’ असे मत परमपूज्य डॉ. शिवमुनीजी यांनी व्यक्त केले
‘सूर्यदत्ता’तर्फे आयोजित रोजगार मेळाव्यात हजार विद्यार्थ्यांचा सहभाग पुणे : सगळीकडे मंदीची चर्चा सुरू असताना, पुण्यात ‘सूर्यदत्ता’तर्फे आयोजित रोजगार मेळाव्यात ४५ कंपन्या आणि हजारपेक्षा जास्त उमेदवारांनी हजेरी लावली. यातून साधारण २५० उमेदवारांना १२ ते ४० हजार रुपयांपर्यंतची नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
‘लोकसेवक होऊन देशाचा चेहरामोहरा बदलण्याची इच्छा’ पुणे : ‘प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर आता नव्या भूमिकेसाठी इच्छुक आहे. नोकरीच्या कार्यकाळात पासपोर्ट विभागाचा चेहरा बदलला. आता लोकसेवक होऊन देशाचा चेहरामोहरा बदलण्याची इच्छा आहे. समाजातील दुजाभाव, भेद संपवण्यासाठी मला काम करायचे आहे. त्यासाठी मला आपली सोबत हवी असून, ती मिळाल्यास मी कुठेही कमी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language